आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नर्मदालयने शोधली संकटातून संधी
- कोरोना संकट काळात दिले कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
पुणे,07 नोव्हेबर (हिन्दुस्तान समाचार ) : कोरोना साथरोगामुळे देशात संकटांची मालिका उभी केली. व्यवसाय, उद्योग, शिक्षण आणि नोक-या सर्वच क्षेत्र या साथरोगामुळे प्रभावित झालेत. पण, मध्यप्रदेशातील निमाड भागातील काही आदिवासी मुला-मुलींना कोरोना साथरोगाचा अनपेक्षित लाभ झालाय. या शालेय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. त्याबळावर आता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. ‘नर्मदालय’ संस्थेच्या संस्थापिका व विश्वस्त भारती ठाकूर यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात माहिती देताना भारती ठाकूर म्हणाल्या की, “कधी-कधी वाईटातून चांगले घडते” या उक्तीचा प्रत्यय कोरोना काळात आला. कोरोना साथरोगाला प्रतिबंध लावण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. याकाळात लोकांचा एकमेकांशी संपर्क केवळ मोबाईलवरून होत होता. परंतु, या संकटाच्या काळातही नर्मदालयने संधी शोधली. बाहेरच्या जगाला माहिती नसलेले मध्यप्रदेशातील खरगोना जिल्ह्यात नर्मदेच्या काठी असलेल्या लेपा खेड्यातील आदिवासी मुलांना नर्मदालय संस्थेमार्फत स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्यात आले...
View Full News